Sanjay Gandhi Niradhar Yojana ( संजय गांधी निराधार योजना ) :-
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना केव्हा सुरू झाली यासाठी असलेली पात्रता कोणती अर्ज प्रक्रिया लागणारे आवश्यक कागदपत्रे लागणारा एकूण कालावधी आणि या योजनेमध्ये सध्या मिळणारे मासिक मानधन किती याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. |

संजय गांधी निराधार योजना दिनांक 15 ऑगस्ट 1995 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात सुरू झाली विधवा महिलांचे कल्याण करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजना सुरू झाली त्यावेळी सहाशे रुपये प्रति मिळणार मानधन हे दिले जात असत |
संजय गांधी निराधार योजना पात्र व्यक्ती :-
संजय गांधी योजनेचा लाभार्थी हा विधवा महिला / परिपक्या महिला / अविवाहित महिला / घटस्फोटीत महिला / दिव्यांग व्यक्ती (दिव्यांग हा किमान 40 टक्के असावा) तसेच वेश्याव्यवसायापासून मुक्त महिला (AIDS सिकलसेल कर्करोग ) यांसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या महिला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा अशा व्यक्तींना संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
संजय गांधी निराधार योजनेत मिळणारे मासिक मानधन :-
संजय गांधी निराधार योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सध्याच्या तारखेत महाराष्ट्र मध्ये पंधराशे रुपये इतके मानधन हे प्रति महिन्याला त्यांचे आधार कार्ड सिलिंग असलेल्या बँकेत किंवा पोस्ट बँकेत डीबीटी द्वारे ट्रान्सफर केले जाते जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा फक्त सहाशे रुपये इतके मानधन मिळत असे त्यानंतर 800 त्यानंतर 1000 आणि पुन्हा नंतर 1200 आणि सध्याच्या घडीला 1500 रुपये इतके मानधन हे प्रति महिन्याला लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर डीबीटी द्वारे ट्रान्सफर केले जात आहे.
sanjay gandhi niradhar yojana documents :-
संजय गांधी निराधार योजना आवश्यक कागदपत्रे :-
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा निराधार असावा त्याचे नामे शेती जमीन नसावी त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 21000 इतके असावे किंवा तो दारिद्र्यरेषेखालील असावा त्यासोबतच इतर काही लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत ते पुढे दिले आहेत.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे मतदार ओळखपत्र (इलेक्शन कार्ड)
- शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड
- अर्जदार विधवा महिला असल्यास पतीचे मूर्ती प्रमाणपत्र / अर्जदार अविवाहित असेल तर तसे शंभर रुपयांच्या बॉण्डवरील स्वयंघोषणापत्र / अर्जदार महिला दिव्यांग अपंग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र जर महिला घटस्फोटीत महिला असेल तर कोर्टाचे आदेशाचे प्रत.
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बँक खाते क्रमांक पासबुक ( खातेशी आधार लिंक असणे आवश्यक )
संजय गांधी निराधार योजना साठी अर्ज कोठे व कसा करावा ?
संजय गांधी निराधार योजनेसाठीअर्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक ऑनलाईन आणि दुसरा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता अर्जाची पीडीएफ कॉपी या पोस्टखाली मी दिलेली आहेत ती डाऊनलोड करून तो अर्ज व्यवस्थित भरून वरील प्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून आपल्या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे तलाठी यांच्याकडे जमा करावा तलाठी चौकशी करून तुमचा प्रस्ताव अर्ज 7 दिवसात संजय गांधी निराधार योजनेच्या मासिक बैठकीत ज्या बैठकीचे अध्यक्ष संजय गांधी तहसीलदार नायब तहसीलदार असे राजपत्रित अधिकारी असतात त्यांच्या अध्यक्षतेखालील मासिक बैठकीत तुमचा जो अर्ज आहे सादर केलेला त्या अर्जालाअंतिम मंजुरी दिली जाते अर्थात तुमची पगार चालू होते
संजय गांधी निराधार योजना मंजूर होण्यासाठी लागणारा कालावधी :-
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या अर्जावर तलाठी मार्फत चौकशी होऊन फाईल मंजुरीसाठी संजय गांधी निराधार योजना या तहसील कार्यालयाच्या विभागात जमा केली जाते कागदपत्रांची योग्य पडताळणी करून व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील मासिक बैठकीमध्ये तुमच्या अर्जावर अंतिम मंजुरी दिली जाते आणि यादीही ग्रामपंचायत मध्ये किंवा नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमधील अधिकारी कार्यालय असतात त्याच्यासमोर किंवा तलाठी कार्यालय यांच्यासमोर मंजूर झालेली यादी लावी जाते
मित्रांनो वरील माहिती आपणास कशी वाटली खाली कमेंट करा व ही पोस्ट आपल्या गरजू मित्र मैत्रिणी तसेच आप्तेष्टांना नक्की शेअर करा आणि या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे जर तुम्हाला लाईव्ह बघायचे असेल तर आमच्या माहिती मराठी यूट्यूब चैनल ला भेट द्या.