सरकारी योजना

पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) :-

pm विश्वकर्मा योजना (pm vishwakarma gov in): प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र शासनाने 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा दिनी सुरू केलेली एक नवीन योजना आहे. या योजनेची घोषणा देशाचे पंतप्रधान यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी केली होती. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट पारंपारिक कारागीर आणि कारागीरांना त्यांची उत्पादने आणि सेवा वाढवण्यासाठी आर्थिक आणि कौशल्यपूर्ण सहाय्य प्रदान करणे आहे. या योजनेंतर्गत, कारागीर आणि कारागीर यांना ‘विश्वकर्मा’ म्हणून ओळखले जाईल आणि त्यांना योजनेतील पुढील प्रमाणे लाभ मिळण्यास पात्र केले जाईल.

या योजनेअंतर्गत 18 ते 50 वयोगटातील कारागिरांना म्हणजे शिंपी /सुतार/लोहार/ शिल्पकार /कुंभार /सोनार/ चर्मकार/ फुलांचे हार बनवणारे /धोबी /नाव टोपल्या चटया बनवणारे /खेळणी बनवणारे /मिस्त्री यांसारख्या कारागिरांना

  • पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल.
  • सात ते पंधरा दिवस मार्गदर्शन तथा शिकवणी दिली जाईल त्यादरम्यान रुपये पाचशे रुपये प्रति दिवस मिळेल.
  • अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य रुपये 15000/- मिळतील.
  • डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल.  
  •  5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रु. 1 लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रु. 2 लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जवळील सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करा सोबत आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन जाऑनलाइन अर्ज भरताना तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा आणि ऑनलाइन अर्ज भरते वेळेस तुमचे बायोमेट्रिक लागते त्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेटेड असायला हवे जेणेकरून तुमचे फिंगरप्रिंट येतील.

ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आमचे माहिती मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या mahitimarathi.org या वेबसाईटला सतत भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला शासकीय योजना आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *