CSCसरकारी योजना

Apply Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अर्ज करा :-

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आज आपण Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana योजनेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना म्हणजे काय ? What is Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana?
  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे लाभ आणि फायदे काय आहे ? What are the benefits and advantages of Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना योजनेसाठी कोण पात्र आहे ? Who is eligible for Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana scheme?
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? How to Apply Online for Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना म्हणजे काय ?

What is Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana?

मित्रांनो केंद्र शासनाने असंघटित कामगारांना वृद्धावस्थेमध्ये अर्थात म्हातारपणी आर्थिक संरक्षण निश्चित करण्यासाठी त्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रधान मंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे.यामध्ये वय 60 झाल्यानंतर अर्जदाराला तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे लाभ आणि फायदे काय आहे ? What are the benefits and advantages of Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये प्रति महिना हे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे निवृत्तीवेत स्वरूपामध्ये.
तर निवृत्त वेतनाच्या प्राप्ती दरम्यान लाभार्थी मयत झाल्यास लाभार्थ्याच्या जोडीदारास लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पेन्शन पैकी 50% कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना योजनेसाठी कोण पात्र आहे ? Who is eligible for Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana scheme?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांसाठी आहे .
यामध्ये मुख्यतः वीटभट्टी कामगार रस्त्यावरील विक्रेते बांधकाम कामगार चांभार शेतमजूर विडी कामगार चांभार कुंभार धोबी रिक्षाचालक शिंपी आता टेलर इत्यादी व तत्सम व्यवसाय करणाऱ्या ज्यांचे वय 18 ते 40 दरम्यान आहे त्यांचे मासिक उत्पन्न 15000 दरमहा त्यापेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे बँकेचे खाते या योजनेत लिंक करायचे आहे त्यानंतर शासन प्रति महिन्याला शंभर रुपये इतके रुपये तुमचे कापून घेईल आणि त्यामध्ये स्वतःचे शंभर रुपये स्वतः शासन टाकेल आणि साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल प्रति महिन्याला.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करताना लागणारे कागदपत्रे :- Documents required while applying for Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक जर जनधन खाते असेल तर लय चांगले त्यानंतर तुमच्या आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक कसावा आणि तुमचे आधार अपडेट असावे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरता वेळेस तुमचे बायोमेट्रिक सहज येतील.

How to Apply Online for Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन देखील अर्ज करू शकता किंवा तुम्ही स्वतः देखील अर्ज करू शकता स्वतः ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाच्या श्रम रोजगार मंत्रालयाच्या mandhan.in या वेबसाईटवर जायचे आहे यावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक समोर उपलब्ध आहे
( How To Apply For Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana 2024 ) त्यावर ती क्लिक करून युट्युब वर जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याप्रमाणे अर्ज करा.शासनाच्या विविध उपयोगी योजनांच्या माहितीसाठी आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा संपूर्ण पोस्ट वाचली त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *